
0
4
0
9
0
3
शासन
माई बहीण मले म्हणे दादा कसं असते शासन
म्या म्हणलं बाईले जाणारे लोक चांगले असनं
दादा शेती खरडून गेली त्याचे पैसे कसे भेटनं
म्या म्हणलं बाईले शेतीचा पंचनामा जसा असनं
शासनाने घोषित केले पंधरा हजार हेक्टरनं भेटन
सारं शेत खरडून गेलं , आमचं गुजरान कसं असनं
देतो म्हणता म्हणता वेळ काढू करते शासन
असं करून राजकीय लोक शाबूत ठेवते आसन
पाच वर्षात सर्वच पदाधिकारी कमाई करते कसून
शेतकऱ्याची हाल पाहत रहा चौकाचौकात बसून
माई बहीण मायावर रागावली, कारे असं कसं शासन
न्या म्हणलं बाईले आत्ताची लोकं भ्रष्टाचारी असनं
श्याम राठोड
कारंजा लाड, जि.वाशिम
0
4
0
9
0
3





