
0
5
3
6
4
3
तेजस्वी आरूषी
आयुष्याच्या जखमांवरती
फुंकर होऊन येते आरूषी
झोपडीतल्या ताटामधली
भाकर होऊन येते आरूषी
सजीवसृष्टीच्या आयुष्यात
चैतन्य होऊन येते आरूषी
काळजातील त्या हुंदक्यांना
मुक्त करण्या येते आरूषी
आयुष्यातील त्या स्वप्नांना
साकार करण्या येते आरूषी
तिमिरातूनी तेजाकडे सदैव
वाट दाखविण्या येते आरूषी
दुःखीतांचे अश्रू ते पुसण्या
मायेचा पदर होतेय आरूषी
हृदयातील प्रेमळ भावनांचा
आदर करण्या येते आरूषी
सर्वस्व समर्पित करणाऱ्यास
ओलावा हृदयीचा देते आरूषी
आयुष्यातील अंधार घालण्या
सोनेरी पहाट बनून येते आरूषी
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
=======
0
5
3
6
4
3



