Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रविदर्भ

मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा

तांत्रिक कामगार युनियनची मागणी

0 5 1 7 8 8

मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा

तांत्रिक कामगार युनियनची मागणी

नागपूर : (दि १०) तांत्रिक कामगार युनियन यांच्या वतीने लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील बहुतांश 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

सदर उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणे, ट्रान्सफॉर्मर व इतर मौल्यवान साहित्य असल्यामुळे चोरी, तोडफोड किंवा अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा घटना घडल्यास कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच सार्वजनिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात संघटनेने यापूर्वीही लेखी पत्रव्यवहार करून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील सद्यस्थिती लक्षात घेता सर्व 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर , केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे , राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले , बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम , नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील, युवा तांत्रिक कामगार संसद मुख्य समन्वयक देवेंद्र साळुंके यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे