0
4
8
2
9
7
फुगा
फुगा एक रागाचा
नाकावर बसला
आईच्या लाडुने
फाटकन फुटला……
फुगा एक प्रेमाचा
जाऊन बागेत उडाला
हाती हात घेता बाई
प्रीतीचा रंग उधळला…
एक फुगा विश्वासाचा
मनी खोलवर रुजला
अविश्वास दिसताच
मनातून बाहेर पडला….
एक फुगा आनंदाचा
नील असमानी विहरला
हर्षाचा ओघ विरताच
भूमीवर येऊन आपटला…
एक फुगा दुःखाचा
मीच फोडून टाकला
मुलात मन रमावले
जीव नातवंडात गुंतला….
वसुधा वैभव नाईक, पुणे
0
4
8
2
9
7



