
0
3
4
5
8
2
वसंत पंचमी
दिन हा वसंत पंचमीचा
रूप सरस्वती मातेचे
बुद्धी देवता विद्येची
ज्ञान प्रफुल्लित महालक्ष्मीचे
हंसा स्वामिनी विणा वादनी
सारस्वती ,शारदा शब्दांनी
काव्यात नवनवीन साहित्य
आहे समाज प्रबोधनी
रम्य वसंत पंचमी आज
गाते कोकिळा सुस्वर
वृक्षवल्ली फुलू लागली
सृष्टी सौंदर्य हरित अस्तर
अल्हाद मनाला वाटे
सरस्वती शांत तुझे व्यक्तिमत्व
शुभ्र वस्त्र परिधान करतील
सुंदर मोहक तुझे अस्तित्व
ऋतू वसंत बहरला
फळा फुलांनी डवरला
सौरभ पसरला धरणीवर
पूजा वसंत पंचमीची करू चला
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
3
4
5
8
2