0
4
8
2
9
7
हपापलेले
इतरांसाठी कुणी नसे
जो तो पाहे आपापले,
गौण झालेय सत्कार्य
सत्कारार्थ हपापलेले…!!१!!
मान,सन्मान,प्रतिष्ठेस
आहेत सारे भुकेलेले,
त्याग, कष्ट, साधनेस
मात्र अनेक मुकलेले…!!२!!
वडिलोपार्जित सत्तेस
भाऊ भाऊ खेटलेले,
सेवेसाठी कुणी नाही
स्वार्थासाठीच पेटलेले…!!३!!
ऋणानुबंधांचे धागेदोरे
आपापसात ताणलेले,
मी म्हणेन तेच मानावे
अहंकार असे ठाणलेले…!!४!!
जिव्हाळ्याचे सुसंवाद
जिथे तिथे आटलेले,
नात्यागोत्यांचे वस्त्रही
जागो जागी फाटलेले… !!५!!
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
=======
0
4
8
2
9
7



