0
4
8
2
9
0
भरकटताना
स्वतःला सावरावे
दिशाहीन भरकटताना
संयमाचे बांध घालावेत
स्वैर अनिर्बंध होताना
पदोपदी लाभतील तुला
क्षण मोहाचे
क्षणेक विचार कर तू
मोहात पडताना
कुणी वळवू पाहिलं
तुझ्या ध्येयाचे तारू
साद अंतर्मनाची ऐक
नाव ध्येयाची वल्हवताना
इथे क्षणोक्षणी सातत्याने
दक्ष असावे लागते
सावधपणे चाल रे
आपले गंतव्यस्थान गाठताना
डाॅ.नझीर शेख, राहाता
जिल्हा अहिल्यानगर
0
4
8
2
9
0



