
0
6
5
6
0
2
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
यवलीचे भूमिपुत्र नाव
माणिक बंडोजी इंगळे
मंजुळाबाई बंडोपंतांचे
बाळ तेजस्वी नि आगळे..!!
समर्थ आडकोजी महाराज
वरखेडचे त्यांचे गुरू
कृपाप्रसादे तुकडोजीने
केले समाजकार्य सुरू…!!
ग्रामगीतेचा ग्रंथ लिहूनी
स्वावलंबनाचा दिला मंत्र
गावानेच गाव घडवावे
आत्मसंयमन हेच तंत्र…!!
खंजिरीच्या तालावर त्यांनी
प्रबोधनाचे गीत वाजविले
अंधश्रद्धा जातिभेद तोडून
सर्वधर्म समभाव जागविले…!!
झुकले नाहीत कधीच
ब्रिटिशांच्या तुरुंगातही
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अमर विचाररूपी आजही..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि.बीड
0
6
5
6
0
2



