Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखबीडब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“दीपावलीच्या फराळाची लज्जत चकली आणि लाडू”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 4 5 3 2

“दीपावलीच्या फराळाची लज्जत चकली आणि लाडू”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“कुरकुरीत चकली गोल गोल..
गोड गोड लाडू ढब्बाढोल..”

दीपावलीचा सण म्हटलं, की फराळामध्ये चकली आणि लाडू यांचा समावेश तर असणारच ना ! आता चकली आणि लाडू यांची ओळख नाही असे तर कोणी शोधून सापडणार नाही. पण तरीही आज आपण चकली आणि लाडवाची थोडी गट्टी करायला जाणार आहोत त्यांच्या इतिहासाकडे, चालेल ना ?चला तर मग जाणून घेऊया थोडेसे कुरकुरीत चकली आणि लाडवा विषयी..!!

तसं पाहता चकली हा मुळात दाक्षिणात्य अर्थातच दक्षिण भारतातील खाद्यपदार्थ आहे. तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘मुरुक्कु’ या पदार्थाचे हे सुधारित किंवा महाराष्ट्रीयन रूप मानले जाते. मुरुक्कु चकली प्रामुख्याने तांदळाच्या पिठापासून बनवली जाते. महाराष्ट्रात चकली हा प्रामुख्याने दिवाळीच्या फराळात बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे .महाराष्ट्रात तांदूळ, पोहे, उडीद डाळ आणि चणाडाळ भाजून (भाजणीचे पीठ बनवून) बनवण्याची पारंपारिक पद्धत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ वगळता मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक या शेजारी राज्यांमध्ये ही चकली मोठ्या प्रमाणावर बनवली जाते. तामिळनाडू, केरळमध्ये ‘मुरूक्कू’ तसेच आंध्रप्रदेशमध्ये ‘चक्रालू’ आणि गुजरात मध्ये ‘चक्री’ असे तिला म्हटले जाते. तर अशी ही चकली म्हणजे सर्वांचा आवडता फराळाचा पदार्थ आहे. बालपणाचा विचार केला; तर आई चकलीला काटे कसे तयार करत असेल यापासून अनेक प्रश्न मनाला पडलेले आहेत ..हो ना? आठवा पाहू आपणाला काय काय प्रश्न पडले होते तेव्हा..!!

आता विचार करूया ‘लाडू’ अर्थात गोड गोड लाडक्या लाडवाचा. लाडू हा भारत आणि संपूर्ण भारतीय उपखंडाचा अर्थात भारत, पाकिस्तान, बांगलादेशातील एक अतिशय प्राचीन आणि पारंपारिक गोलाकार गोड पदार्थ आहे. लाडू हा शब्द संस्कृत भाषेतील ‘लड्डूक’ किंवा ‘लडुका’ या शब्दावरून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान गोल’ असा होतो. प्राचीन काळात 300 -400 इसापूर्व सुश्रुत संहितेनुसार लाडू हा प्रामुख्याने औषध म्हणून वापरला जात असे. बेसन पीठ, रवा, गव्हाचे पीठ, तूप, साखर किंवा गूळ आणि सुकामेवा यांच्यापासून लाडू तयार केले जातात. बेसनाचे लाडू, मोतीचूर लाडू , रवा लाडू, नारळाचे लाडू, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, तेलंगणा मधील प्रसिद्ध तिरुपतीचे लाडू असे विविध प्रकार आपणाला पाहायला मिळतात.

तर अशी ही ‘चकली अन् लाडू’ आज बालकाव्य स्पर्धेमध्ये अवतरले आणि चक्क समूह त्यांच्याभोवती गोल गोल फिरू लागला. चक्क लाडू आणि चकलीचे भांडण सुद्धा सुरू झाले. राहुल दादांनी चकली अन् लाडू हा विषय देऊन दीपावलीच्या फराळाची रंगत आणि लज्जत वाढवण्याचे काम केले. चला तर मग घेऊया चकली आणि लाडवाची मस्त चव… जाता जाता एक टीप… बालकाव्याविषयी थोडेसे जाणून घेऊया, या सदराचे व्यवस्थित वाचन करून बालकवींनी बालकाव्य लेखन करावे असे मला वाटते.मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण !धन्यवाद…!!!

शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 5 3 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे