
0
5
2
4
6
3
भोंदूबाबा
अंधश्रध्देचे पेव फुटले
भोंदूबाबा उदंड झाले
अक्कल गहाण ठेवून
लोक त्यांना पोसू लागले
कसले तरी तीर्थ देऊन
किती पैसे उकळू लागले
विकृत या भोंदूबाबांचे
उखळ पांढरे होऊ लागले
सुशिक्षित ही यांना भुलले
नेते,मंत्रीही पायी वाकले
प्रगत विज्ञान युगातही
अंधश्रध्देचे बाजार मांडले
किती स्त्रिया बाटवल्या
विकृतीचा कळस झाला
वारेमाप पैसा मिळवून
उजळ माथ्याने फिरु लागला
अति हाव वाढू लागली
भोंदूबाबांची चलती झाली
नीतिमत्ता या धनिकांनी
वेशीवर टांगून ठेवली
वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जि. सांगली
0
5
2
4
6
3



