ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
दीपस्तंभ
कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड, जि.नागपूर

0
5
2
4
6
3
दीपस्तंभ
डोळ्यात प्रेम न दाखवित असते
त्यांच्या रागाचे हे कठोर माप
सदैव धडपडत असतो दिनरात
कारण तोच असतो आपला बाप
उन्हातान्हात न घाबरता
काबाडकष्ट करण्यास तयार
संपूर्ण घरदार चालविण्यास
खंबीर तो असतो आपला बाप
येवोत कितीही संकटे त्रास
फाटक्या बंडीला छिद्रे सात
कसा एका धागेत गुंफतोस
संसाराचा रेलगाडा चालवितोस
दशहत आहे वडीलांची म्हणूनच
कुणी बोट न दाखविती उगारून
बोट धरू चालविण्या शिकवितो
कारण तोच आपला बाप असतो
ध्येयाकडे नेणारी ही शिडी आहे
पाठीवरची ही थाप काय आहे
आपण बाप झाल्यानंतर कळेल
होय, बाप दीपस्तंभ काय आहे
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, जि.नागपूर
0
5
2
4
6
3



