Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

सौंदर्यवान रूपाली (भाग १)

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 4 8 2 9 4

सौंदर्यवान रूपाली (भाग १)

रात्री आठची वेळ असेल अण्णा कल्ब मध्ये गेले होते. तीनही भांवडे रुपालीपेक्षा लहान होती. आईने सर्वाना सु..सु करून आत घरात घेतले. मयुरही सु..सु करून आत आला. मयुर हा रूपालीचा मानलेला मामेभाऊ. रुपालीकडे चार-चार दिवस नेहमी येऊन राहत असे.अगदी लहानपणीच्या आठवणी रूपालीच्या डोळ्यासमोर धावत होत्या. पावसाळ्याचे ते दिवस होते, आकाश ढगानी काळेकुट्ट झाले होते, विजांची लखलखाट तर मध्येच गडगडाट. रुपाली अकरा वर्षाची तर मयुर पंधरा वर्षांचा रुपालीला रात्री अंगणात जायची भिती वाटायची. आई व मयुर भित्री रुपाली म्हणून तिला सारखे चिडवायचे मयुर दारात उभा राहायला तयार झाला की, ती सुध्दा बाहेर जाऊन आली तोच विजेचा मोठा गडगडाट झाला तशीच रुपाली धावत जाऊन मयुरला बिलगली.त्या वेळी रुपालीला काय ते कळेना आईच्या दृष्टीने आपली मुलगी रुपाली लहान वाटत नव्हती.मयुरने रुपालीच्या चेहर्‍यावरून व डोक्यावरून हात फिरवला.आई बघतच राहिली. आई म्हणाली, “चला सर्व घराच्या आत या.”

या गोष्टीला आता वीस वर्ष ओलाडली अंतरमणातील त्या गोष्टी आठवून रुपालीचे अश्रू ओघळू लागतात. आता फार दिवस जगेल असे तिला वाटत नव्हते.मामी मयुरच्या आई म्हणायच्या ” रुपालीच्या लावण्यानं मयुरच्या जन्माचं वाटोळ केलं.” हे ऐकूण ह्रदयाला झरे पडतात. पण त्यांनी तरी तसे का म्हणू नये ? पण तो तर त्याचा प्रत्यक्ष मुलगा मातृहदयाला जे वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं आणि रुपालीला भरभरून आल्याशिवाय राहात नव्हते. सर्वजण म्हणतात,” रुपाली सुंदर आहे, तिचे डोळे घायाळ करतात” मला असे लहानपणी ऐकताच आनंद व्हायचा. पण आता कुणी सौंदर्याची तारीफ केली तर नको हा विषय असे वाटते व रुपाली तिथून उठून आत जाते. डाॅक्टर म्हणतात “मला क्षय झालेला आहे.” माझ्या मैत्रीणी विचारतात “तुला काय झालयं?”माझे मन म्हणतयं उगीचचं झुरू नये. कोरडया ह्रदयात कशाला उगीच आघात करते ऐकवत नाही. ह्रदयाचे पडसाद कसे ऐकू येणार”.

मयुरचे वडील एका खाजगी शाळेत मास्तर आहेत. सर्वजण त्यांना मास्तर म्हणत. म्हणून मयूर सुध्दा आपल्या वडीलांना मास्तर म्हणायचां तर रुपालीचे वडील रेल्वेत नोकरीला होते.त्यावेळेस अण्णानी पंधरा रुपया पासून सुरूवात केली. आता चारशे रुपयापर्यंत वाढ झाली.मास्तर चाळीस रुपयावर लागलेत तर आता त्याना एकशे पंचवीस पर्यंत वाढ झाली. दोघांनाही बुध्दीबळाचा फार नाद. एकत्र आले की त्याचा कितीतरी वेळ खेळण्यात जाई. मास्तरांना वाचनाचा नादही दांडगा होता.अण्णा व मास्तर एकाच वर्गात होते अण्णानी मॅट्रिक नापास झाल्यावर शाळा सोडून नौकरी पत्तकारली तर मास्तरांनी पुढील शिक्षणाकरीता काॅलेजला गेलेत पण घरच्या परिस्थितीमुळे बी.ए.पूर्ण केले नाहीत मास्तरांचे गाव आणि आईचे माहेर एकच म्हणून फार जवळचा घरोबा आई मास्तरांना भाऊ म्हणायची व भाऊबीजेला ओवाळीत असे.माझी आई व मयूरची आई अर्थातच मामीची दृढ मैत्री कारण मामीला सासरचे कुणीचं नव्हतं नणंदा पण त्याही आपल्या संसारात रूढल्यातं.

मयूर मास्तरचा एकुलता एक मुलगा त्याच्यावर कुंटुबाची सर्व आशा होती नेहमी दयाळू, मायाळू व शांत वृत्तीचे मास्तर एका शुन्यात पाहत असायचे. मामीच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय एकही दिवस जात नव्हता.कारण मयूरच्या बुध्दीमतेच्या गौरवामुळे नेहमी आनंदाश्रू असायचे. प्रत्येकदा वर्गात प्रथम, वक्तृत्वस्पर्धत पहिले बक्षीस म्हणून कुंटुबाला त्याचा अभिमान वाटायचा.हा मुलगा आपले नाव काढील. आणि आज मयूर कवडीमोल झाला, याला कारण म्हणजे अभागी रुपाली ! (क्रमशः)

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे