स्टार गेझ सोसायटीत गीता जयंती साजरी
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
स्टार गेझ सोसायटीत गीता जयंती साजरी
गीता तत्त्वज्ञान प्रसार उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे-दि.5डिसे.(प्रतिनिधी) भारतीय तत्वज्ञानाचे सार सांगणा-या गीतेचा प्रचार करण्यासाठी आणि त्यातील जीवमूल्याचे संस्कार प्रत्येकाच्या मनात रूजवण्यासाठी गीता जयंतीच्या निमित्ताने देश-
विदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून श्रीमद्भगवद्गीतेच्या पठण व अभ्यासाशी अनेक कुटूंबे जोडता येतील, या उद्देशाने आयोजित उपक्रमाचा भाग म्हणून गीता परिवार, पुणे यांनी दि. १ डिसेंबर रोजी बावधन येथील स्टार गेझ सोसायटीमध्ये गीतेच्या १८ अध्यायांचा पठण कार्यक्रम साजरा झाला.
सोसायटीतील रहीवाशांच्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साज-या झालेल्या कार्यक्रमात लहान मुलांनी गीता पठणा बरोबरच हनुमान चालीसाचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमात सर्वांना गीतेच्या प्रती वितरीत करण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थितांनी गीतेची शिकवणुक जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेखा गिल्ड यांनी केले होते. मधुकर पौर्णेकर, दिलीप खोपडे,रागिणी शर्मा, नेहा व अखिल औरंगाबादकर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात 100 सभासद उपस्थित होते.





