ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
अजून बाकी आहे….
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
3
0
0
अजून बाकी आहे….
जागृत उमेदीची भाषा
पल्लवित आशा आहे
लखलखत्या सार्या दिशा
अजून बाकी आहे….
भिती नसे पराजयाची
विजयाची नशा आहे
लढणे रक्तात माझ्या
अजून बाकी आहे….
नव्या पर्वाचा उन्माद
हव्यास नवाच आहे
नवा इतिहास घडविणे
अजून बाकी आहे….
पांथस्थ मी सन्मार्गाचा
दुष्कर्म वर्ज्य आहे
कर्माचा लेखाजोखा माझा
अजून बाकी आहे….
ध्येयवेडा मी नित्य
प्रयत्नांची शिकस्त आहे
ध्येयप्राप्ती निश्चित माझी
अजून बाकी आहे….
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
========
0
4
8
3
0
0



