0
4
8
2
9
4
तू भारत भाग्यविधाता
तू भारत भाग्यविधाता, तू मानवतेचा दाता।
वंदीतो भीमा तुला मी, चरणी ठेवूनी माथा।।
जीवन आमुचे भीमा , तुच उजळले।
उपकार ऐसें तुझे आज ईथे झाले।।
जी होती अजाण लेकरे, झाली वैज्ञानिक आता…..
दुःखीतांचा तु होऊनिया वाली।
शुद्र दिनदलितांचा तु,झाला कैवारी।।
रक्षण करण्या आमुचे, धावला तु भिमनाथा….
समता स्वातंत्र्य तो बंधुभाव।
धर्म जातीमध्ये तो,नको भेदभाव।।
अखंडित देशासाठी झाला संविधान निर्माता….
भीम नावाचा रे गुंजतो, हा डंका ।चयन
अमेरिका इंग्लंड आणि ती श्रीलंका।
रोज हा सूर्य उगवतो, तुझी गाऊनी गाथा…
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
0
4
8
2
9
4



