“कृतज्ञतेची ‘रंगसंगती’ ओसंडते तेव्हा”; राजश्री ढाकणे
मराठीचे शिलेदार समूहाप्रती शब्दसुमने

“कृतज्ञतेची ‘रंगसंगती’ ओसंडते तेव्हा”; राजश्री ढाकणे
मराठीचे शिलेदार समूहाप्रती शब्दसुमने
“बालमनाच्या रंगसंगतीचा
सर्वोत्कृष्ट स्थानी सन्मान
संविधानदिन औचित्यावर
शब्द गाती कृतज्ञता गाण..!”
सर्व ‘मराठीचे शिलेदार’ परिवाराला सस्नेह वंदन आणि भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
“तुमचा फोटो पाठवा” हे आदरणीय राहुल दादांचे तीनच शब्द पण त्यात आनंद, सन्मान आणि कुतूहल दडलेलं आहे…! मग थोडया वेळाने सर्व समूहात फेरफटका मारल्याशिवाय कळत नाही की ; आपले पोस्टर कोणत्या साहित्याच्या चौकात आहे…!…ते दृष्टीस पडण्याआधी शिलेदार परिवारातील प्रेरणादायी, कौतुकपर, अभिनंदनीय शुभेच्छापुष्प बघून मन आनंदात चिंब भिजले …!
मग सर्वांना कृतज्ञतापूर्वक हात जोडत जोडत थेट पोस्टर गाठले नि माझ्या बालमनाने कशी रंगसंगती जुळवली याचे स्वतःलाच कौतुक वाटते …!…का वाटते माहित आहे का… मीच सांगते एखादी नवीन साडी, दागिने, कोणतीही वस्तू किती छान आहे हे जेव्हा चार दहा मैत्रिणी म्हणतात, तेव्हा आपली निवड आणखीच भारी दिसू लागते अगदी तसंच पोस्टर बघून आणि पुष्पवर्षाव पाहून होतं. मग दिवसभर एक वेगळंच वारं अंगात भिनलेलं असतं…!..वेगळाच उत्साह, आनंद मूठभर मास आल्यागत अवस्था होते… मग एवढा आनंद ज्या परिवारात मिळतो तिथं कृतज्ञता भाव दाटून आल्याशिवाय राहत नाही.
एकदा कामाच्या ढिगाऱ्यात शिरले की, हे सर्व राहून जातं… उशिरा आभार नको वाटतात…आणि मग ते भाव तसेच राहतात..म्हणून आज कामात पाऊल टाकण्याआधी कृतज्ञता व्यक्त करायची असं मनात पक्क ठरवलं…शब्दांची रंगसंगती आधीच मनात सांडली होती. त्यामुळे लिहिण्याआधी ते समोर हजरच…!
काल दिनांक २५.११.२०२४ रोजी समूहात डोकावलं आणि विषय वाचला “रंगसंगती” प्रत्येक साहित्यप्रकाराचा एक ढाचा असतो. प्रत्येकजण वेगळा आहे.. कोणीच कोणासारखे नाही हे प्रथमतः मी समजून घेते… त्या ढाच्यात कुठलाही बदल न करता विषयाशी सुसंगत चित्रण मनात धरून… आपल्या लेखणीचे वेगळेपण जपून मी सर्व साहित्यिक प्रकार लेखन करते.
व्याकरणदृष्टया शुद्ध शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करते… (कधी एखादा शब्द चूक होऊ शकते ) पण त्यासाठी आपली रचना पाठवण्याआधी पुन्हा वाचली तर होणारी चूक टाळता येते मलातरी. ‘बालकाव्य’ हा माझ्यासाठी नवीन प्रकार. लिहिताना मी अगदी बालक होऊन कल्पना करते. बालमन कोणते शब्द वापरेल, कुठपर्यंत कल्पना करेल याचाही ताळमेळ राखते. बालकाव्य हे (बालमन नसलेली ) कविता होणार नाही याची काळजी घेते. अगदी बालपणात मी जाते आणि तेव्हाच मला बालसुलभ कल्पना बालकाव्यात आणता येतात.
अशीच काल मी बालकाव्यरचना केली आणि ती कल्पना आदरणीय परीक्षकांना भावली… आणि तिचा सन्मान त्यांनी केला… खरंच खूप छान वाटले आज… आपल्याला बालकाव्य जमतंय हा विश्वास वृद्धिंगत झाला. सर्व साहित्यिक प्रकारच काय पण माझ्या साहित्याचा जन्मच इथे झाला हे मी आजन्म आवर्जून सांगत राहील…!
“आजची सर्वोत्कृष्ट बालकाव्य रचना पोस्टर ” या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत माझ्या ‘रंगसंगती ‘ बालकाव्य रचनेची सर्वोत्कृष्ट स्थानी निवड करून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा मुख्य संस्थापक अध्यक्ष आदर्श प्रशासक, विविध स्पर्धेचे मुख्य आयोजक ‘मराठी भाषेला’ अभिजात दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे शिलेदार विद्यापीठाचे कुलगुरू… देवांश… ध्येयवेडे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राहुलदादा पाटील, तुमच्या कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आणि संस्थेच्या सचिव पल्लवीताई पाटील, शिलेदार परिवाराच्या मुख्य प्रशासक मुख्य परीक्षक… संपादक संवेदनशील व्यक्तिमत्व प्रिय सौ. सविता पाटील ठाकरे, मुख्य प्रशासक…परीक्षक.. संकलक… प्रेमळ व्यक्तिमत्व प्रिय सौ. वैशालीताई अंड्रस्कर, त्रिवेणी काव्याच्या मुख्य मार्गदर्शक.. परीक्षक प्रिय वृंदाताई आणि सर्व सन्माननीय आदरणीय प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक.. संकलक… मार्गदर्शक… प्रिय सौ. स्वातीताई, प्रिय सुधाताई, प्रिय प्रतिमाताई,प्रिय तारकाताई,प्रिय शर्मिलाताई,आदरणीय श्री विष्णू दादा, संग्राम दादा, अरविंद दादा, अशोक दादा, विकास दादा, हंसराज दादा सर्व शिलेदार प्रशासकीय टीमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
माझ्या “रंगसंगती” सर्वोत्कृष्ट बालकाव्य रचनेवर प्रेरणादायी… कौतुकपर… अभिनंदनीय शुभेच्छा देऊन लेखणीचे बळ वाढविणाऱ्या सर्व सन्माननीय दादा ताईंचे मनःपूर्वक ऋणयुक्त खूप खूप धन्यवाद…!!! आणि आजच्या सर्वोत्कृष्ट स्पर्धेतील सर्व सहभागी आणि विजेत्या सन्माननीय दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन…!!!
कवयित्री राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा
©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह





