आभारीय मनोगत: एक सुखद धक्का
कवयित्री सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर
♾️♾️♾️♾️🍃🔰🍃♾️♾️♾️♾️
*🙏आभारीय मनोगत: एक सुखद धक्का🙏*
♾️♾️♾️♾️🍃🔰🍃♾️♾️♾️♾️
*🌨️सकाळी शाळेत जाण्याची लगबग सुरू….. चार्जिंगला लावलेला फोन घेतला… आणि सहज मेसेज चेक केले… पाहतेय तर काय राहुल दादांचा मेसेज, “तुमचा फोटो पाठवा”. काय दिवसाची सुरुवात झाली. आनंद गगनात मावेना! शाळेत जायचा घाईने पटकन दादाला फोटो पाठवला.*
*🌀शाळेत पोहोचेपर्यंत डोक्यात विचार सुरू नक्की कोणत्या काव्य रचनेसाठी फोटो मागितला. पहिली तासिका कधी संपते आणि मी कधी स्टाफ रूम मध्ये जाऊन मोबाईल पाहते असे झाले होते. कालच्या चारोळीचा विषय “विचार करू या” आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सहज पैलूवर विषय होता. भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात.*
*✍️आज आपल्या समूहात जो मराठी भाषेचा वसा घेतला आहे तो जपण्यासाठी आपले आदरणीय दादा, आदरणीय प्रशासक मंडळ अतोनात प्रयत्न करत आहेत. एक लेखनकार, कवयित्री म्हणून आपले ही कर्तव्य आहेच की आपण आपली मायबोली जपली पाहीजेच.*
*👍एक गंमत म्हणून माझ्या घरचा किस्सा आठवला आहे. माझ्या सासरी हिंदी शब्दाचा वापर बोलताना अधिक होतो. कारण सासर्यांची गुजरात ला भरपूर वर्षे नोकरी असल्यामुळे सर्व मराठी बोलतात पण सर्वाचे अनेक शब्द हिंदी मध्येच. माझ्या सासूना राग आला जेव्हा मी माझ्या मुलीला मला आई म्हणायचे शिकवत होते. माझ्या मुलीने मला मम्मी म्हटलेले बिलकुल आवडणार नव्हतं.अहो जे प्रेम, माया, वात्सल्य आई या शब्दात आहे ते मम्मी या शब्दात खरचं वाटेल का हो… मला कुणाच्या भावना दुखावायच्या नाही.*
*✍️आज मला अभिमान वाटतो की माझी मुलगी आई-बाबा आम्हां दोघांना म्हणते… खूप जणांनी कौतुक केले की ती मराठी सुंदर बोलते… मराठीतील श्लोक, भावगीत स्पर्धेत तिचा नंबर ही आला आहे. म्हणून चारोळीचा विषयावर अलगद मनातील भावना उतरल्या. माझ्या चारोळीला सर्वोत्कृष्ट चारोळी म्हणून पुरस्कृत केले त्याबद्दल मी आदरणीय राहूल दादा व सर्व आदरणीय प्रशासक मंडळाचे मनपूर्वक आभार मानते.*
♾️♾️♾️♾️🍃🔰🍃♾️♾️♾️♾️
*कवयित्री सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🔰🍃♾️♾️♾️♾️





