
0
4
0
9
0
3
अक्षरगंध
गोडी लागली मजला
शब्दांगणी खेळायची
सुटे धागे अक्षरांचे
शब्दांमध्ये गुंफायची ॥
गंध अक्षरांचा फार
अर्थ देवुनिया जाई
मनामध्ये शब्दफुले
गीत गातात अंगाई ॥
अक्षरांना भेटती रे
काव्यसुमनांची साथ
ओढ लागे साहित्याची
लेखना तत्पर हात ॥
समुहात दरवळे
सर्वत्र अक्षरगंध
शब्दांचीच उधळण
पसरला काव्यरंग ॥
दत्ता काजळे(ज्ञानाग्रज)
तुरोरी जि.धाराशिव
0
4
0
9
0
3





