Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

ओवी

आशा कोवे-गेडाम वणी जि. यवतमाळ

0 4 8 2 9 4

ओवी

जन्म मायेच्या कुशीत
दारी तुळस कोवळी |
अंतरात झुळूक झोका
सांज खुलते सावळी ||

कुटुंबात आनंदाचे
रंग खुलविते लेक |
स्वातंत्र्य पेरताना
का गं विचार नसतो नेक ||

लेनं-देनं रिस्तेदारी
मुलगी परक्याचं धन |
ऐकुन भावना आजही
अस्सं थबकते मन ||

जीवनाच्या समरांगणी
उभे अस्तित्व कोरलं
तडजोड सुटली नाही
नारी जपते डोरलं ||

काटे बोचरे जीवनी
काळजात वाहे भळ
संसाराच्या सुखासाठी
मनी जपते हिरवळ ||

बाईपणाचं गं लेणं
सहजासहजी घडत नाही
वाटणीत सारे क्षण
तिच्यासाठी उरत नाही ||

आशा कोवे-गेडाम
वणी जि. यवतमाळ
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे