सिर्सी येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे भव्य आयोजन
शहर प्रतिनिधी अखिल रोडे
सिर्सी येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे भव्य आयोजन
शहर प्रतिनिधी अखिल रोडे
नागपूर/सिर्सी : सिर्सी नगरीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी सोहळ्याचे एकत्रित आयोजन श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती यांच्याकडून करण्यात आले.
या सोहळ्यात दिनांक १६ /१२/२०२५ रोज मंगळवार ला भव्य शोभायात्रा,पालखी संताजी जगनाडे महाराज देवस्थान सिर्सी येथून निघून गावातील मुख्य रस्तावरून भजन मंडळी यांच्या तालावर नाचत – फिरकत पुन्हा देवस्थान येथे शोभायात्रेचे समापन होईल.
बुधवार दिनांक १७ /१२/२५ सायंकाळी भजन मंडळीच्या उपस्थितीत जागृती सोहळा होईल. भव्य महाप्रसादाचे आयोजन गुरवार दिनांक १८ /१२/२५ ला श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज देवस्थान. उमरेड रोड नविन वस्ती जवळ येथे करण्यात आले.
सर्व जाती ,धर्माच्या ,पंताच्या नागरीकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी असे आव्हान श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज उत्सव समिती सिर्सी*यांच्याकडून करण्यात आले.



