Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सिर्सी रमाई बुद्धविहार तर्फे संविधान प्रस्तावना सामूहिक वाचन

अखिल रोडे, प्रतिनिधी सिर्सी

0 4 8 2 8 4

सिर्सी रमाई बुद्धविहार तर्फे संविधान प्रस्तावना सामूहिक वाचन

वसंतराव नाईक कृषी विद्यालयाच्या विद्यार्थांची संविधान जनजागृती रॅली

भारतीय संविधान उत्साहात संपन्न

अखिल रोडे, प्रतिनिधी सिर्सी

सिर्सी/ उमरेड (दि २६) : सिर्सी गावात रमाई बुद्ध विहार, जय भीम एकता मंडळ, समता सैनिक दल यांच्या कडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज (दि २६) कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. नागरिकांमध्ये संवैधनिक मूल्यांची जागरूकता वाढावी व त्याचे पालन करावे यासाठी उपस्थित नागरीकांनी एकत्र येऊन संविधान प्रस्तावनेचे सामूहिक पठण केले.

२६ नोव्हेंबर रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याचा स्मरणार्थ संविधान दिवस साजरा केला जातो.आजच्या दिवशी संविधान प्रस्तावना पठण व संविधान निर्मितीचे महत्व पठवून दिले. संविधान दिन हा केवळ एक उत्सव नसून देशातील प्रत्येक नागरीकांसाठी आपल्या जबाबदाऱ्यांची आणि कर्तव्याची जाणिव करुन देणारा दिवस आहे. देशाच्या एकतेसाठी व प्रगतीसाठी संविधानाच्या तत्त्वाचे पालन करण्याचा संकल्प करण्यात आला.

वसंतराव नाईक कृषी विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून संविधान जनजागृती करीता हातात जनजागृती फलक घेऊन व जय संविधान , जय भारत अश्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावतील मुख्य रस्त्यावरून रॅली काढत संविधान दिवस साजरा केला गेला.

या मंगल प्रसंगी रमाई बुद्ध विहार येथे संविधान प्रस्तावना पठण करण्याकरीता पँथर यशवंत अंबागडे, रुपेश आंबुलकर गुरुजी, प्रशांत भाऊ भगत, पत्रकार अखिल रोडे, प्रॉपर्टी डीलर सचिन मेंढे , ढाकणे काकाजी , हरीभाऊ सुटे, राजेंद्र सुटे, संघर्ष अंबागडे, वनमाला कांबळे, सत्यभामा कांबळे, वंदना अंबागडे, संगीता गजभिये, चैताली तामगाडगे, धारा हाडके, ज्योसना मेंढे, सुनंदा सुटे इत्यादी नागरीक उपस्थित राहून संविधान दिवस साजरा करण्यात आला. माजी सरपंच दिलीप डडमल व सुधाकर चुटे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत ‘जय संविधान’च्या घोषणा देत विद्यार्थी वर्गाचा उत्सव वाढवला.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे