Breaking
अहमदनगरकविताकोकणगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरनागपूरनांदेडनाशिकपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भ

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

0 4 8 2 9 7

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*☄विषय : सुखाच्या वाटा☄*
*????शनिवार : ०७ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*सुखाच्या वाटा*

आयुष्यही सरते, शोधता सुखाच्या वाटा
जीवन रूपी सागरात, दुःखाच्याच लाटा.//

जावे लागते पुढे पुढे, खात खात थपडा
उठावे लागते फिरून, जरी पडला उपडा.. //

सुखासाठी जेथे तेथे,लाख खाव्या खस्ता
हार ना मानता पार, करावा लागतो रस्ता.. //

नाना आव्हानांची, जरी वळणे नागमोडी
शिताफीने चालवावी, लागते जीवन गाडी..//

होतेय भाळ बंबाळ, रूततो पायात काटा
आगंतुक संकटांना, देता येत नाही फाटा.. //

कणभर फायद्यासाठी, होतो मणभर तोटा
कधी कधी ठरतोय, आपलाच दाम खोटा.. //

दुर्भाग्यवश कुणीतरी, हाकले धरून बखोटा
कधी नशिब हाती देई, सुखाचा बंद लखोटा.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

उघड्या आकाशाखाली
पाल ठोकलेले
नशिब पाथरवटांचे
दगडाखाली ठेचलेले

घेऊन चिमुरडे
पहाटेच चाले हातोडी
दिस उगवण्या आधी
पाषाणांची खांडोळी

हातावर भाकर
पाण्याच्या घोटासवे
तृप्तीचा ढेकर
हातोडीच्या घावासवे

हातावेगळा ढीग
वाट पक्की बनणार
आज इथे उद्या कुठे
नशिब ठरवणार

डांबर पडण्याआधी
पाल दुसरीकडे ठोकती
कच्च्याचे पक्के बनवण्या
राब राब राबती

कच्चेपणाच्या लकेरी
जीवनात कोरलेल्या
त्या सुखाच्या वाटा
स्वप्नातच सजलेल्या

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

दुःख हवंय तरी कुणाला
विचारा आपल्या मनाला,
सुखाच्या वाटा शोधतांना
प्रत्येकजण बेजार झाला

सहजासहजी मिळतील
वाटतेय तेवढे सोपे नाही
झाले जर कदाचित तसे
नशीबवान समजा काही

धडपडतोय प्रत्येकजणचं
सर्वांना असते अभिलाषा
होनार तरी सहजासहजी
पूर्तता कुणाची ही मनिषा

सुखाच्या वाटा शोधतांना
खडतड प्रवास करा सुरू
तुमचाच अनुभव आलेला
होईल प्रसंगी तुमचा गुरू

जिद्द,मेहनत,चिकाटी,बळ
देईल तुजला नवसंजिवनी
सुखाच्या वाटा शोधतांना
अवलंब तू करावा जीवनी

असाध्य तेचं साध्य होईल
प्रयत्नांती मिळेल परमेश्वर
सोडू नको धीर तू कदापी
प्रयत्नांचीचं पराकाष्ठा कर

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

सुखाच्या वाटा म्हणजे, जीवनाचा खरा शोध,
अंतर्मनामनाला भिडणारा, आत्मानंदाचा मोद…

ना संपत्तीच्या गाभ्यात, ना स्वप्नांच्या थव्यांत,
ते तर आहे दडलेलं, साध्या क्षणांच्या गर्भात…

डोंगरावरच्या शिखरात, सुख सापडत नसते,
ते तर नदीच्या प्रवाहात, गुपितासारखे वाहते…

चंद्रकोरीच्या प्रकाशात, ते हळुवार चमकते,
तप्त वैराण वाळवंटात, झऱ्यासारखे झरते..

सुख हे ना मागणारे, ना त्याला हक्क लागतो,
मनाच्या माळरानावर, सहज अंकूर रूजतो..

निसर्गाच्या गाण्यात,पक्ष्यांच्या स्वैर उडण्यात
ते साद घालते कधी कधी, अंतरीच्या गाण्यात…

शोधायच्या असतील वाटा, तर स्वतःत पाहा खोल,
सुखाला नाही लागत, अती भव्यतेचा तोल..

ते तिथेच उभे असते, जिथे शांतता फुलते,
नि साध्या कृतज्ञतेने, जीवनभरासाठी झुलते…

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या , मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*सुखाच्या वाटा*

प्रीतीचा दीप परसात लावियेला
मायेन तो अंगणी उजळवला……

प्रकाशमय झाला सारा संसार
प्रेमात नाहिच मुळीच हं हार……

मायेचा वृक्ष लावला परसदारी
फळे चाखली आपल्याच घरी…..

प्रेमान फुलवले ही वृक्षवेली
मिळाली मायाममतेची सावली…..

प्रेम फुललेय छान नभांगणात
जमूया सारेजण या प्रेमांगणात…..

प्रेमांगण फुलू दे जन माणसात
व्देश नको देवा मानवामानवात…..

घराचा प्रेमाचा दीप तेवत राहू दे
प्रेमांगणात माणूसकी अशीच राहू दे..

सुखाच्या वाटा शोधल्या कुटुंबात
प्रीतीचा झुला झुलावला अंगणात….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

बांधून खुणगाठ मनाशी
फिरतो आहे दाहीदिशा
सर करता डोंगर दुःखाचे
जीवनाची होतेय दुर्दशा

नशीबाच्या चक्रव्यूहाने
जखडलो मी चहुबाजूंनी
संकटांची सुरु मालिका
जातो हवालदिल होऊनी

आशेच्या या हिंदोळ्यावर
शोधतोय सुखाच्या वाटा
धावतो वेगे मृगजळामागे
ह्रदयाला निराशेचा काटा

सुख म्हणजे काय असतं?
विचारला प्रश्न मज मनाला
चार घास मुखात आनंदाचे
निवांत निद्रा लागावी देहाला

पाहिलं डोकावून अंतर्मनात
दिसल्या मज सुखाच्या वाटा
विश्वरुपापेक्षा पहा रे स्वरुप
ऐहिक सुखाच्या सोड पळवाटा

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

हरतात काही,आयुष्यच आहे
मनाने मात्र नको हरायला
मन खंबीर तर साथ देईल सृष्टी
जगही तुला जिंकायला
समजू नको फुलेच मिळतील
रूतेल कधी पायी काटा
हरवून जातील काळोखात कधी
चालता चालता सुखाच्या वाटा
भासमान सुख समोर असता
उभ्या नव्याने गिरी मेखला
घाबरलास तर संपलास राजा
नसतील सोबती तरी चाल एकला
तुझा प्रण, जिद्द तुझी,
परिश्रम घेशील जेवढे जीवनी
सुखाच्या वाटा येती जुळूनी
काळोखी रात्री उजाडतील तेव्हा
चंद्र चांदण्या येऊन नभात
करतील अभिषेक रविकिरण तुझे
होईल नाव तुझेही जगात
उठ! ध्येय प्राप्तीचे श्वासकण
पसरवून टाक भोवताली हवेत
धावशील क्षणक्षण ध्येयवाटा मग
आकाशही घेशील कवेत

*कु. संगिता रामटेके/भोवते*
*साकोली, भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

गोड आठवणींच्या झुल्यावर
मन घेता हिंदोळा
आठवांचा वेढा मनाला
घालतोय वेटोळा

सुखाच्या वाटा शोधताना
रूक्ष सूक्ष झाली काया
तू जाताच सख्या रे
आटलीय सर्वांचीच माया

श्वासांच इतक ओझं झाल
गुंतलेल्या जीवनात
समजावतेय मीही मनाला
हस तूही वेदनांत

मला प्रेम जपायला आवडतं
नी आवडतं ते सोसायला
सुखाच्या वाटा शोधल्या
पण ये ना तू ही चाखायला

मी खंगत चालली पण संपत नाही
वाटा सुखाच्या शोधत राही
परतीच्या प्रवासात झाले व्याकूळ
का तू रे सोडीले गोकुळ

*सौ.भावना अजय इटकीकर*
*हिंगणघाट जि.वर्धा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

चालत होतो डोंगराच्या घाटा
शोधत मी सुखाच्या वाटा
क्षणभंगुर आहे जीवन मोठा
वेड्या मना स्वप्न झाला खोटा||

धावलो मी मृगजळाच्या मागे
सावध झालो झोपेतून जागे
विव्हळत होतो घेऊन भूतकाळ
समोर दिसेना भविष्यकाळ||

समोर उभे होते तीन दिपस्तंभ
म्हणाले कसे, रहा तु ठाम
प्रेमात मिळेल मायेची ऊब
राहू आनंदी समाधान खुप||

शिक्षण घेऊ होऊ खुप मोठे
वाटेत आले संकटाचे काटे
सोसले आम्ही दुःखाचे चटके
कष्टासमोर वाटेल गगनही छोटे||

चढू नकोस आता डोंगराचा घाटा
क्षणभंगुर जरी जीवन आहे मोठा
स्वप्न आता होणार नाही खोटा
आम्ही परत देऊ सुखाच्या वाटा||

*रंजना राहुल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मोर जि गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*

वाट जरी काट्याची ती
पाऊल तू टाकत राहा
ध्येय उरी घेऊनी बाळा
तू फक्त चालत राहा

हताश होऊन तू तुझे
प्रयत्न मात्र थांबवू नको
साकार करतील स्वप्न कुणी
विसंबून कुणावर राहू नको

जा पुढे पुढे तू जातच राहा
सुर्य उद्याचा उजळून येईल
दिसतील सुखाच्या वाटा तुज
स्वप्न उरीचे साकार होईल

गाठशील तू मग क्षितिजही
न राही काही कठीण तुला
आयुष्याचे करशील सोने
उणे न काही राहिल तुजला

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे