Breaking
आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणे

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षक ध्येय’तर्फे ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन

वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी

0 6 2 7 9 8

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षक ध्येय’तर्फे ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन

घरबसल्या चित्र काढून रंगवा आणि फोटो काढून पाठवा!

विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल, अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६

वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे, (दि १५): शिक्षकांचे व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बाल दिनानिमित्त ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२६’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सातवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.

गट अ (इयत्ता पहिली ते पाचवी) चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. रंगीबेरंगी फुलपाखरू
2. निसर्गचित्र
3. माझा आवडता पक्षी
४. पतंग

गट ब (इयत्ता सहावी ते दहावी) चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. प्लॅस्टिकमुक्त भारत
2. आठवडी बाजार
3. डिजिटल इंडिया
४. माझे आवडते फळ

गट क (इयत्ता अकरावी ते पदवी) चे विषय आहेत. (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. विकसित भारत @ २०४७
2. माझ्या स्वप्नातील जग
3. सोशल मीडिया
४. पाणी हेच जीवन
5.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढून त्याला रंग देऊन त्या रंगीत चित्राचा फोटो काढून ९६२३२३७१३५ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे. अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.

तीनही गटातील चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) यांचा समावेश आहे. चित्रकला स्पर्धेचा निकाल दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी, बालदिनाच्या दिवशी राज्यातील विविध वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येईल.

राज्यातील मुख्याध्यापक व चित्रकला शिक्षक यांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन मधुकर घायदार, नाशिक; प्रभाकर कोळसे, यशवंत गडवार, डॉ. अनिस बेग, वर्धा; डी जी पाटील, विजय अहिरे, नंदुरबार; कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर; डॉ. इस्माईल पठाण, कोल्हापूर; संजय पवार रायगड; सौ. सुरेखा उजगरे, मुंबई; सविता डाखोरे, सोलापूर; अशरफ आंगजरलेकर, विद्या देवळेकर, रत्नागिरी; वसुधा नाईक, पुणे; अर्चना भरकाडे, अंजली वारकरी, अमरावती; कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार, जळगांव; वसुधा नाईक, पुणे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 7 9 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे