‘सिटीझन चार्टर पोस्टल फोरम’च्या सभेतील चर्चा रंगली
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

‘सिटीझन चार्टर पोस्टल फोरम’च्या सभेतील चर्चा रंगली
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि १ एप्रिल) केन्द्र शासनाचे पोष्ट खाते दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि अतिमोठ्या शहरांपासून खेडोपाडी वाड्या – वस्त्यांपर्यंत पसरलेले एकमेव खाते आहे. या खात्याच्या विविध लोकोपयोगी योजना आहेत. त्यात संपूर्ण जीवन विमा योजना, मुदतीचा विमा योजना ,सुकन्या समृद्धी योजना, भविष्य निर्वाह निधी, आपत्ती ठेव योजना, मासिक प्राप्ती योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, ग्रामसुरक्षा योजना, ग्रामसुमंगल योजना, ग्रामप्रिया योजना, चिल्ड्रेन पा़ँलिसी इ. चा समावेश आहे.
या योजना तळा- गाळापर्यंत पोचविण्यासाठी ‘सिटीझन चार्टर पोस्टल फोरम’ महत्त्वाचा दुवा ठरतो. सदर फोरम प्रत्येक जिल्ह्याच्या पोष्ट मुख्यालयात कार्यरत आहे. रायगड पोष्ट विभागात अलिबाग , पेण , पाली सुधागड,रोहे , मुरूड, श्रीवर्धन ,म्हसळे ,माणगाव ,तळे , महाड व पोलादपूर या तालुक्यांंचा समावेश होतो. या तालुक्यांसाठी कार्यरत असलेली सिटीझन चार्टर पोस्टल फोरम अलिबाग येथील प्रमुख पोष्टमास्तर यांच्या कार्यालयात कार्यरत आहे. या फोरमचे सदस्य शासकीय व अशासकीय अशा दोन प्रकारचे असून त्यांच्या नावाची शिफारस । अधिक्षक पोष्ट रायगड विभाग यांच्याकडून केली जाते.
या फोरमची त्रैमासिक सभा येथील मुख्य पोष्ट कार्यालयात घेण्यात आली. सदर सभेस रायगड पोष्ट विभागाचे अधिक्षक सुनिल थळकर , मुख्य पोष्टमास्तर अलिबाग सौ. निलीमा पाटील ,ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर ,निवृत्त मुख्याध्यापक राम शिन्दे तसेच प्रकाश पाटील , मिलिंद पाटील , महेन्द्र हुमणे व अनिल दाभेकर हे सदस्य उपस्थित होते.
मागील सभेचे इतिवृत्त मुख्य पोष्टमास्तर सौ. पाटील यांनी वाचून दाखविले तसेच विविध ठिकाणी असलेल्या पोष्टपेट्यांची निगा व पत्रांची वितरण व्यवस्था याबाबत श्री बळवंत वालेकर व प्राध्या. शाम जोगळेकर यांनी मागील सभेझात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
या सभेत पोष्टाच्या विविध योजनांच्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली . त्यात पोष्टात येणाऱ्या व जाणाऱ्या टपालाची काळजी , येणाऱ्या व जाणाऱ्या टपालावर पोष्टाचे सुस्पष्ट शिक्के मारणे, ग्रामीण डाक जीवन विमा , ग्राम सुमंगल (मनीबॕक) योजना ,[ग्रामप्रिया योजना , मासिक प्राप्ती योजना , ज्येष्ठ नागरिक बचत योजना याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी आभारप्रदर्शनानंतर कामकाज समाप्त झाले.



