Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

100 वे महिला ज्योतिर्विद अधिवेशन : विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर अध्यक्षपद भूषविणार

वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 8 7

100 वे महिला ज्योतिर्विद अधिवेशन : विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर अध्यक्षपद भूषविणार

वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे

पुणे : 24 जून 2025 (प्रतिनिधी): महिला ज्योतिर्विद या संस्थेचे 100 वे महिला ज्योतिर्विद अधिवेशन शनिवार दिनांक 28जून2025 रोजी दुपारी 1 ते 6 या वेळेत वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, कल्पना हाॅटेल समोर, श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शेजारी, सदाशिव पेठ-पुणे येथे होणार आहे.या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आंतरराष्ट्रीय कीर्तिचे ज्येष्ठ ज्योतिर्विद आणि विश्वविख्यात हस्ताक्षर मनोविश्लेषण तज्ञ विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर भूषविणार आहेत.असे संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष डाॅ.संजिवनी मुळे यांनी कळवले आहे.

अधिवेशन विनामूल्य आहे.ख्यातनाम ज्योतिर्विद आदिनाथ साळवी उदघाटक असून या सोहळ्यास सुप्रसिध्द रमलज्ञ आणि ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे, श्रीपाद मुळे, मंगेश महाडिक, संदीप पागे,सुरेखा पाटील, डाॅ.रजनी साबदे,प्रा.स्मिता गिरी, डाॅ.सविता महाडिक ॲड.सुनिता पागे, डाॅ.जयश्री बेलसरे, आरती घाटपांडे, आभा करंदीकर, ॲड.मालती शर्भा , ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

सदर 100व्या महिला.ज्योतिर्विद अधिवेशनाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनितकालिकाच्या 800व्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.महिला.ज्योतिर्विद संस्थेच्या वाटचालीत योगदान
देणा-या पदाधिका-यांना’ महिला.ज्योतिर्विद शताब्दी पुरस्कार ‘ मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. गुरु,शनि, राहु यांचे गोचर भ्रमण, गोचर भ्रमणाचे महत्व, युध्दजन्य परिस्थितीचे ग्रहमान,
आदि महत्वपूर्ण विषयांवर मान्यवरांची अभ्यासपूर्ण व्याख्याने होणार आहेत. निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि सत्कार समारोपात होणार आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे