कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
सलतयं ना?; मायादेवी गायकवाड
0
1
8
3
9
4
सलतंय ना?
उणी दुनी,दुसऱ्यांची काढतांना
मनाला, असुरी आनंद होतो,
जेव्हा,स्वतः वर वेळ येते
तेव्हा, सलतंय ना, म्हणतो.
दुसऱ्यांना, दोष देवून
अवहेलना सदैव, करणे,
सोपे वाटू नये, कधीही
निंदा नालस्ती, करणे.
माणुसकी ,जपायला
हृदय विशाल,करा जरा,
सुखात,लोळणाऱ्यानों
दुःखाला, करू नका किनारा.
स्वतःच्या,वाटेत फुले पसरून
काटे का पेरता रस्त्यावर?,
रक्त बंबाळ, पाय पाहून
हसू विषारी, नको चेहऱ्यावर.
मी चांगला, तो वाईट
हा,भेदभाव कशाला?
बंधूभाव, वाढवू मनात
दूर फेका,विषमतेला.
भाषा जगाच्या, व्यवहाराची
समजून वागायला पाहिजे,
डूख धरून,दंश करणारा साप
वेळीच ठेचायला, शिकले पाहिजे.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
=============
0
1
8
3
9
4