Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आशिष जयवंत राणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 3 0 0

आशिष जयवंत राणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये कार्यरत

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि १०) आशिष जयवंत राणे सर आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये गेली १४ वर्षे ज्ञानदानाचे कार्य प्रभावीपणे करीत आहेत.

आशिष राणे सर यांना भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबई यांच्या तर्फे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन व भूगोल विषयाची रुची निर्माण करण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सक्रीय सहकार्याबद्दल तसेच भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा समन्वयक म्हणून उत्कृष्टरीत्या जबाबदारी पार पाडल्याबद्दल राज्यस्तरीय उपक्रमशील भूगोल शिक्षक हा पुरस्कार ६ वेळा मिळाला आहे.

अलिबाग तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, आवास या पतसंस्थेचे ते सचिव म्हणून प्रभावीपणे काम करीत आहेत. मंगळवार दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी होरायझन हॉल, खडताळपूल – अलिबाग येथे अलिबाग – मुरुड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या सौजन्याने त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला अलिबाग – मुरूड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा किणी, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, माहिला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तृप्ती पाटील, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजिवनी नाईक, अलिबाग तालुका गट शिक्षणाधिकारी सुनिल गवळी आदी मान्यवर उपस्थितीत होते.

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आशिष जयवंत राणे सर यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच तथा विद्यमान सरपंच अभिजीत प्रभाकर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व आजी माजी विद्यार्थी, आवास ग्रामस्थ यांनी आभिनंदन केले. तसेच त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे