
0
5
2
2
6
4
जंगल वाचवू या
पर्यावरण संरक्षक म्हणून
आहे संयुक्तिक जबाबदारी
आरोग्य सुदृढ ठेवण्या
लावा एक झाड घरोघरी
जागतिक वन दिनानिमित्त
संकल्प करून होऊ कर्तव्य दक्ष
लहान्याचे करू मोठे झाड
होईल मोठा कल्पवृक्ष
औद्योगिक करणाने
जंगल होत चालले नष्ट
अशुद्ध हवा,पर्यावरण बिघडलेला
मानवाला होऊ लागला कष्ट
पशु पक्षी प्राणी मात्रांना
अवघड झाले जगणं
गावा गावात येऊ लागले प्राणी
मानवाला मुश्किल झाले राहणं
आता तरी करा विचार
वृक्षांना द्या थोडा आधार
दृष्टांकडून संरक्षण करू या
चला जंगल वाचवू या
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
5
2
2
6
4



