कवितानागपूरभंडाराविदर्भसाहित्यगंध
देवी तू; वनिता गभणे
0
4
8
2
9
3
देवी तू
तुझ्या विचारांची
प्रेरणा घ्यावी वाटली…
म्हणून तुझ्यासारखा लुगडा घालून,
नाकात नथ घातली..
स्वाभिमानी, करारी बाणा
श्रृंगारपेटीत मिळेचना..!!
तशीच तासभर मी
आरशालाच खेटली.. !
अस्तावून,पस्तावून
हिंमत बांधली उरात..
झप झप पावले टाकत
चालू लागले घरात…
तेवढ्यात बाबाचे झिंगत येणे नडले…
लोप पावला करारी बाणा
मंद झाली पाऊले…
तुझी वेषभूषेतही,
एकट्या बाबाशी भिडणे जमले नाही…
इंग्रजाच्या अन्यायाशी कशी केली तू लढाई? …
तुझे आचार, तुझे विचार
तुझी हिंमत घ्यावी वाटते..
बापाच्या जाचापासून मुक्त
आईला एक किंमत द्यावी वाटते..
तुला वाचते मी तुलाच पूजते
तुझ्या शौर्य, धैर्यला मी
उराशी घेऊन निजते…
झाशीची राणी तू
देवी तू माझ्या मनातील
दे जराशी मर्दानगी
तू तुझ्या तनातील….
वनिता गभणे
आसगाव भंडारा
============
0
4
8
2
9
3



