Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 8 2 3 9

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : चिरहरण🥀*
*🍂बुधवार : ०५/ ०८ /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चिरहरण*

आज होणार नाही ,स्रींचे चिरहरण
घटनाच भारताची , करते संरक्षण

द्रौपदीचा चेहरा, नव्याने उजळला
कौरवांना इथल्या, थरकाप सुटला

सुशिक्षित होऊन, वाचल्या संविधान
लेखणीस केल्या ,शस्त्र आत्मसन्मान

अन्याय सोसायची संपविली सवय
पुरुषाप्रती धास्ती , फेकून दिले भय

ठेचा त्या ठोकरांना तुडवित चालतात
पाय मजबूत करुनी नांदताहे संसारात

सक्षम विज्ञानाने , झाली विद्येची पुजारी
आधार कुटुंबाचा अन् तलवार दुधारी

स्वातंत्र्य समतेचे आणि न्याय बंधुत्वाचे
अलंकार धारली स्त्री ,शील चारीत्र्यांचे

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि, यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

पाचांचे झाले असतील लाख
शतांचे झाले कोट्यान् कोटी
इथे मजबूर पांडव आजही
मग्रूर कौरवात द्रौपदी एकटी.//

आज चौकात रस्त्यात सभा
सरसावते दुःशासनाची टोळी
चिरहरण करण्या दुष्ट धावता
हवेत विरते नारीची आरोळी..//

शरमिंदे बुजुर्ग वृद्ध पितामह
अन् छद्मी हसती कैक कर्ण
पर रक्षण करण्या तिची लाज
आज कुणी ना होई बंधू कृष्ण//

स्वहस्ते छाती झाकू पाहते
टाहो फोडतेय डोळे मिटूनी
पर हिंस्र श्वापदे तुटुन पडता
काय करेल हरिणी बापुडी..//

व्यर्थ याचना अनर्थ भयंकर
सामर्थ्यवान ना कुणी रक्षक
कोमल देहाचे लचके तोडती
एक एक करूनी ते नरभक्षक.//

सैतानी भुकेची आग झोंबते
लाज जळूनी राख राख होते
माज इतका गाज गाजवूनी
शांत होई त्या वासनेचे जाते..//

हे नव्हे केवळ नारीचे शोषण
चिरहरण असे त्या मर्दानगीचे
जे मर्द असूनही षंढासारखे
पाहात राहिले धिंडवडे अब्रूचे.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चिरहरण*

कौरवांची फोफावे जमात,
नारीचा करण्यासी घात;
आजही द्रौपदीचा टाहो,
ऐकू येतो दिशादिशांत

रूप बदलूनी फिरती जगी
दु:शासनाचे हात अजूनी
लुटती दिवसा ढवळ्या
भोग्य नारीला ते मानूनी

पाहून कुणी छद्मी हसती
किंकाळ्या हवेत विरती
निर्भयांचे बळी हो जाती
षंढ काही नुसते बघती

विटंबना नारीची होताना
रील बनवती दगडी पुतळे
संवेदनाच सारी हरपली
सोयर सुतकची कुठले?

वासनांध ते जगी व्यापले
नीतिमत्ता वेशीवर टांगली
मानवतेच्या मानेवरूनी
खुशालची सुरी फिरवली

तेंव्हा द्रौपदीसी रक्षण्या
श्रीकृष्ण धावूनी आला
आता अंतर्मनात, नारी
जागृत ठेव कृष्णतत्वाला

नारी तू असशी सबला
हेच तू ठेव गं ध्यानी
असुरी वृत्ती ठेचण्यासी
येई तू शस्त्र परजूनी

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

भरसभेत दाटला अंधार
मौन झाला सारा दरबार
अन्यायाचा झाला जयघोष
दौप्रदीच्या मनाने केला आक्रोश

मनात वेदनांचे वादळ उठले
अश्रुंनी व्याकुळ नेत्र झाले
तरीही हिंमत न हरता
सत्यासाठी पाऊल उचलले

संकटसमयी धैर्य राखून
केली तिने प्रभूची प्रार्थना
श्रद्धेने मिळाली दिव्य साथ
तिच्या अब्रूच्या रक्षणा

चीरहरण केवळ वस्राचे नव्हते
सन्मानाचा तो अनादर होता
स्रीच्या अस्मितेवर झालेला
अन्यायाचा प्रहार होता

आजही या कथेतून शिकू
मानवतेचा दीप लावू
स्रीचा सन्मान करू
तिला आदराने वागवू

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

रोजचेच झाले सवयीचे
चिरहरण येथे द्रौपदीचे
सत्तेत बसलेत भिष्माचार्य
लाड पुरवत गांधारीचे

कुठे जळते मणीपूर
लुटली जाते अब्रू दिवसा
आला दिवस ढकलायचा
नाही उद्याचा भरवसा

माज सत्ताधाऱ्यांचा
वाढतोय दिवसेंदिवस
आपलेच घर भरण्याची
भागत नाही कधी हवस

आक्रोश चिरडण्यासाठी
सगळी सत्ता पणाला लावली
तरीही आग विझली नाही
उपमर्द होतो पावलोपावली

हे ही दिवस जातील
होईल सत्याची पहाट
जळावे लागेल तोपर्यंत
करावी लागेल काटछाट

मार्ग एकच आता
प्रश्न लावून धरावा
विरोधकांच्या मनातलाही
ओळखता यावा कावा

*सविता धमगाये*
*ता. जिल्हा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

दुष्ट झाली सत्ता
भ्रष्ट झाली निती
ज्याला त्याला जडली
नाण्यावरती प्रीती..

‘त्याग’ शब्दाला आज
लागलीयं वाळवी..
दिसेनात दूरवर
माणसे ती हळवी..

स्वार्थाची मोहमाया
हर पदात वसली..
प्रामाणिक हातात
बेडी गेली कसली!

विकासाचा पैसा जाई
नेत्यांच्या घश्यात
गरीब बिचारा अडके
बेकारीच्या फाश्यात..

न्याय मागता आज
पडते पाठीवर काठी…
कळेना हा अट्टाहास
सत्तेचा कशासाठी?..

कुठवर सहायचे हे
लोकशाहीचे चिरहरण?
आठवा त्या क्रांतिविरांचे
स्वांतत्र्यासाठीचे वीरमरण

आता राहू नका भोळे
उघडा जरासे डोळे..
सत्ताधारी कौरवांना
शिकवू संविधानाचे धडे

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️

*चिरहरण*

देशाची सत्ता ज्यांच्या हाती सोपविली
दिसतेय त्यांचीच मती भ्रष्ट झालेली
होतेय अपमानास्पद शाब्दिक चिरहरण
किती खालच्या स्तराला गेले हे राजकारण…

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

अब्रूचे चिरहरण होताना राजकारणात
आजकाल बघतोय आपण चित्र
संसदेत एकमेकांचे कट्टर वैरी
बाहेर असतात एकमेकांचे मित्र.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

दु:शासनाने द्रौपदीचे
केले चिरहरण
कापड पुरवून कृष्णाने
केले त्याचे गर्वहरण

*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️
*चिरहरण*

भर सभेत द्रौपदी रडली,धर्म झाला लाजिरवाणा,
वीर बसले नतमस्तक,अन्याय झाला बेभान…
कृष्ण धावला भक्तीसाठी,राखिला तिचा मान,
चिरहरणचा दृष्टांत देतो,स्त्रीसन्मानाचे महान ज्ञान…

*श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
♾️♾️♾️♾️☀️🌵☀️♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 2 3 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे