कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
हुडहुडी; वृंदा करमरकर
0
4
8
2
9
7
हुडहुडी
आला महिना थंडीचा
सुखद साखर झोपेचा
बहर गुलाबी स्वप्नांचा
प्रेमरंगात रंगण्याचा
अंगी भरे जरी हुडहुडी
वाटे हवीशी थंडी तरी
शेकोटीवर शेकताना
चहाची लज्जत न्यारी
रंगत आता हुरड्याची
लगबग भरीत पार्ट्यांची
गरम गरम भाकरी संगे
चव चाखावी खर्ड्याची
संक्रांतीचा सण थाटाचा
दिवस हा संक्रमणाचा
तिळगुळाची गोडी न्यारी
नात्यांमध्ये बंध प्रेमाचा
बासनातले गरम कपडे
आले बाहेर घरोघरी
विविध रंग आले फुलून
खाण्याच्या किती त्या परी
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
7



