Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेरायगडसाहित्यगंध

पोशिंदा

पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0 5 3 4 0 0

पोशिंदा

पोशिंदा जो अवघ्या जगाचा
त्याचे गाऊया गुणगान
त्याची पुण्याई फार मोठी
देई सार्‍यांना जीवदान..

हाडाची काडे करतो तो
अन् करतो रक्ताचं पाणी
जीव लावून करतो
बहरलेल्या पिकाची उभारणी.

कधी पाऊस कर्दनकाळ
तर कधी कोरडा दुष्काळ
तरी मायेने प्रेमापोटी करतो
भरल्या शेतीचा सांभाळ..

शेतात पिकलेल्या धान्यास
मिळो योग्य बाजारभाव
नसे अन्य अपेक्षा काही
नसे कोणतीही हाव…

कष्टाचे त्याच्या चीज व्हावे
मुखी जगाच्या पडावे घास चार
सरकार दरबारी दखल घ्यावी
शेतकऱ्यांना मिळावा आधार..

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे