0
1
8
3
2
0
माझी पाककला
मल्टी पल्सेस चटणी
साहित्य: पाव वाटी चना डाळ, पाव वाटी मुगडाळ, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी मसुरडाळ, एक वाटी दही, पाच सहा लसूण पाकळ्या ,जिरे, मोहरी, पाचसहा हिरव्या मिरच्या, एक वाटी चिरलेली कोथिंबीर ,कढीलिंब पाने पाच सहा, तेल.
कृती: सर्व डाळी चारपाच तास पाण्यात भिजत घाला. मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्या. रवीने फिरवून दही त्यात घाला. कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, जिरे मोहरी, कढीलिंब घालून फोडणी तयार करून मिश्रणात ओता. मीठ घालून नीट कालवून खायला द्या ‘मल्टी पल्सेस चटणी’.
वाढप-ही चटणी पाच सहा व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
जिल्हा यवतमाळ
0
1
8
3
2
0