ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
फितूर इथेच आहेत
पंकज रामकृष्ण चारथळ कोराडी रोड, नागपूर

0
5
2
4
6
3
फितूर इथेच आहेत
गर्दीत माणसांच्या दडलेले
कित्येक निष्ठूर आहेत
काय शोधायचे, काय सांगायचे
कित्येक फितूर इथेच आहेत
इथेच निर्वाह, इथेच वास्तव्य
नागरिक इथेच,सोयी, सुविधा सर्व
राष्ट्राशीच करती गद्दारी
परराष्ट्राचाच सदैव गर्व
शिकून शहाणे होती
परराष्ट्रात चाकरी करती
संपन्नतेचा, सुविधांचा
करती बनाव वरती
का संपत्तीच्या लोभाने
ही ज्ञानगंगा उलटी वाहे
काय शोधावे, काय सांगावे
कित्येक फितूर इथेच आहेत
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, नागपूर
0
5
2
4
6
3



