पुण्यात सुखसागरनगर येथे रंगली संगीत रजनी
वसुधा नाईक,पुणे प्रतिनिथी
पुण्यात सुखसागरनगर येथे रंगली संगीत रजनी
वसुधा नाईक,पुणे प्रतिनिथी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे : (दि 22फेब्रु.) वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फ संस्थेच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या तसेच पोलिस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष संगीत रजनी रंगली.
ज्येष्ठ गायिका आशा कामे, कुमुद नाईक, बाल कलावंत पार्थ नाईक तसेच विश्व विख्यात शीळवादक आणि गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी लता,आशा, रफी, किशोर,मुकेश यांची जुनी गाणी सादर केली. राजकपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त वसुधा नाईक यांनी श्री 420 चित्रपटातील गाण्याने वसुधा नाईक यांनी समारोप केला.
या विशेष सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आशा कामे यांना मधुरंग काव्य गौरव पुरस्कार तसेच लाफ इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान केले. मास्टर पार्थ नाईक यालाही लाफ इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिव्या नाईक आणि महेश नाईक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.



