Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रबीडमहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“खरी गरज आहे ती सुविचारांच्या संगनमताची”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय 'आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

“खरी गरज आहे ती सुविचारांच्या संगनमताची”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ काव्यस्पर्धेचे परीक्षण

संगनमत आणि सुविचार हे शब्द तसे पाहता परस्पर विरोधी. कारण संगनमत हा शब्द नेहमी कुटिल कारस्थानासाठी वापरला जातो. कितीतरी राजे महाराजे या संगनमताच्या कुटील कारस्थानाला बळी पडले आहेत.किती तरी शाह्या पालथ्या घालण्याचे काम या संगनमताने केले आहे. छ.संभाजीराजे यांचा अंत सुद्धा या संगनमताच्या कुटील कारस्थानाने झाला. आता प्रश्न असा पडतो की संगनमत सुविचारांचे कसे काय असू शकते. छ.शिवाजी महाराजांनी नाही का आपल्या सवंगड्यांसोबत,मावळ्यांसोबत संगनमत केले आणि स्वराज्याचे तोरण बांधले. फक्त स्वराज्याचे तोरणच नाही तर अनेक अविस्मरणीय आणि आश्चर्यकारक लढाया मोहिमा या आपल्या राजांनी संगणमत करून जिंकल्या. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर ,संगणमत हा शब्द आपण संकुचित अर्थ घेऊन वापरतो असे म्हणावयास हरकत नाही कारण महाराजांनी स्वराज्यासाठी सुविचाराचे संगणमत करून स्वराज्याची स्थापना केली.

बाजारपेठेतील किंवा अर्थशास्त्रातील संगनमताचा विचार करता बाजारपेठेत व्यापक स्पर्धात्मक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांमधील सहयोग. या मिली भगत ची वैशिष्ट्ये म्हणजे किंमत निश्चित करणे, गुप्त बैठका, इंसाईडर ट्रेडिंग, गैर स्पर्धात्मकता आणि बाजार समतोल बिघडविणे. या आर्थिक संगणमतामुळे मग किमती वाढतात, उत्पादनाची गुणवत्ता कमी होते आणि नाविन्यतेला बाधा येते.

थोडक्यात काय तर संगनमत हा करार आहे. मग हे करार बेकायदेशीर असू शकतात. आता म्हणाल संगनमतावर इतकी दीर्घ चर्चा कशासाठी ? अहो ,राहुल दादांनी मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय नाही का “संगनमत” असा दिला आणि आमचे शिलेदार बालकल्पनेत रमले ना..! अगदी लाडू चोरण्यासाठी तर कोणी वाडीत शिरून पेरू तोडण्यासाठी तर कोणी शिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी तसेच निर्मळ आनंद मिळवण्यासाठी संगणमत केले तर कोणी सुट्टीचा आनंद लुटला. अल्पसा असला तरी संगणमताला प्रतिसाद मिळाला म्हणावयास हरकत नाही. आणि आता शिलेदार संगनमत करून नक्कीच आपला सहभाग वाढवतील अशी आशा. आदरणीय राहुल दादांनी मला बालविकाव्य परीक्षण लिहिण्याची संधी दिली, त्याबद्दल मनस्वी आभार. तूर्तास थांबते …धन्यवाद !!!

शर्मिला देशमुख -घुमरे बीड
सहप्रशासक/परीक्षक/ संकलक
मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे