Breaking
ई-पेपरचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 7

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*

*🥀विषय : श्वासोत्सव*🥀
*🍂बुधवार : ०९/ जुलै /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*श्वासोत्सव*

*निरोगी आयुष्यासाठी*
*संवर्धन वृक्षांचे करा*
*घेऊन शुद्ध प्राणवायू*
*श्वासोत्सव करु साजरा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

जाती, रुढी,परंपरेच्या
नावाने करु नका भृणहत्या
उंच गगनी विहारण्या
मज स्वच्छंद श्वासोत्सव घेऊद्या

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

वृक्षारोपण एक सार्वजनिक उत्सव
मिळेल शुद्ध हवा हाच श्वासोत्सव
प्रत्येकांनी करावे वृक्षसंवर्धन
आपोआप होईल पर्यावरण संरक्षण

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

श्वासाचे नियमन करुन
श्वासोत्सव साजरा करू
योगा व्यायामाने
जीवनात रंग भरू

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

जन्म मरणामध्ये
अंतर एका श्वासाच
श्वासोत्सव साध्य करण्या
ऐका म्हणण निर्सगाच

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

देह मानवी भेटला
करूया त्याचा उत्सव
जन्ममरनाच्या अंतरात
करू साजरा श्वासोत्सव

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

वृक्ष लावू, करु वनांचीं पुनर्रचना
हरित होऊ दे पुन्हा ही वसुंधरा..
एकरूप होऊ दे सृष्टी नी मानव
मग साजरा होईल श्वासोत्सव खरा..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*श्वासोस्तव*

डवरलीय वृक्ष वेली
चहुंकडे हिरवाईचा उत्सव
मोकळा श्वास घ्यावा निसर्गात
साजरा करावा श्वासोस्तव.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

दोन श्वासांमध्ये अंतर
म्हणजे असते जीवन
श्वासोत्सव या देहाचा
जगून घेऊया प्रत्येक क्षण

*विजय शिर्के*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

निलाकाशी धावत आली वर्षाराणी
रंगीबिरंगी फुलरांगा सजल्या हिरव्यारानी
शुध्द वातावरणात होईल श्वासोत्सव
गाऊ सुंदर नवचैतन्य गाणी

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷↔️🩷♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे