कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
स्रीजन्म; उर्मिला राऊत
0
4
8
2
9
7
स्त्रीजन्म
मुलगी शिकली प्रगती झाली,
स्त्री उपभोग्य वस्तूच राहीली,
‘कर्तृत्व’ जरी बेडी पाऊली ,
पुरुषाची कळसुत्री बाहुली//१//
काळाने बदलली माणसाची मती,
नाही बदलली स्त्रीची गती,
अजूनही समाजाची तीच निती,
सदैव तिच्या मनीं भीती// २//
सर्वत्र फक्त हा कल्ला,
नारी झाली आता सबला,
तरीही ठरते ती अबला,
समाजाने आवाज तिचा दाबला//३//
माणुसकी गेली वाया,
झाली स्त्रीची मोहमाया,
पुन्हा झाली निर्भया,
शाप ठरली काया//४//
जपले तू स्वतःचे अस्तित्व,
ठरले शाप तुझे स्त्रित्व,
नराधमांना नाही कुठले तत्व,
‘माणूस’ म्हणून नाही महत्त्व //५//
तू होतीस,आहेस, असशील सदैव,
पुरुषाच्या लेखी उपभोग्य वस्तू निर्जीव,
कितीही ठोकला सबलीकरणाचा नारा,
नाही वासनेच्या युगात तुला थारा,
पुरुषत्व सिद्ध करण्याचा तू चारा//६//
उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर
========
0
4
8
2
9
7



