Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,आवासमध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन

श्रावणी सहलीत मुले झाली दंग

0 4 8 2 8 6

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,आवासमध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन

श्रावणी सहलीत मुले झाली दंग

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

अलिबाग: श्रावण म्हटलं की सृष्टीची ऐट काय विचारता…..! संपूर्ण निसर्ग खुलून नटलेला असतो आणि यात वर्षासहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच. शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानुसार सकाळी ठीक ८.०० वाजता विद्यार्थी व शिक्षक विद्यालयातून मिनीडोअर मध्ये बसून मौज मजा करत, गाणी म्हणत अलिबाग तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व सजलेल्या आंबेपूर या गावी पोहोचले. तेथील शिवदत्त मंदिर, उमामहेश्वर शिवमंदिर, अखंड दत्तधुनी मंदिर या अतिशय सुंदर अशा वास्तू पाहून प्रत्येकाचे मन मोहून गेले. मंदिरात जाऊन प्रत्येकाने महादेवाचे व श्रीदत्तांचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली.

त्यानंतर पुन्हा मिनिडोर मध्ये बसून सर्वजण चौल – भोवाळे या ठिकाणी पोहचले आणि श्रीदत्त मंदिराची टेकडी चढण्यास सुरुवात केली. टेकडी चढत असताना मोठ- मोठी झाडे, वेली, हिरवळींचे गालिचे पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. यात सुखद अनुभव म्हणजे तेथील शांतता व वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. अशा प्रफुल्लित वातावरणात ७७५ पायऱ्या चढून केव्हा श्रीदत्त मंदिर आले. हे कोणाला कळलेच नाही. प्रत्येकाने श्रीदत्त मंदिरात जाऊन श्रीदत्तांचे दर्शन घेतले. त्यानंतर थोडा वेळ भटकंती केली व नंतर सर्वांनी स्नेहभोजन केले. त्यानंतर सर्वजण पुन्हा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत पायऱ्या उतरून पायथ्याशी आले.

त्यानंतर मिनीडोअर मध्ये बसून सर्वजण थेरोंडा या ठिकाणी आले. तेथील अतिशय सुंदर असे सुवर्ण हनुमान मंदिर व त्या मंदिराच्या परिसरात असलेले अतिशय सुंदर असे पुतळे व प्रतिकृती पाहून प्रत्येकाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. प्रत्येकाने मंदिरात जाऊन हनुमंताचे दर्शन घेतले व तेथील परीसरात असलेले विविध प्रकारचे पुतळे व प्रतिकृती पाहण्याचा आनंद घेतला.

त्यानंतर मिनिडोअर मध्ये बसून सर्वजण चौल – बागमळा या ठिकाणी आले व तेथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या परिसरात गप्पागोष्टी करत, गाणी म्हणत भटकंती केली. महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला असलेल्या विशाल अशा वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर झोके घेण्याचा मोह विद्यार्थ्यां प्रमाणे शिक्षकांनाही आवरता आला नाही.

अशा रीतीने वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटून सर्वजण सायकाळी ठीक ५.०० वाजता विद्यालयात परतले. या सहलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या वर्षा सहली साठी मोलाचे सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे