गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’
मुख्य संपादक: राहुल पाटील

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : थकलेले बाबा🌤️*
*🔹गुरूवार : २० / ०८ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २३२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*थकलेले बाबा*
*आताशा मला बघवत नाही*
*माझे थकलेले बाबा*॥
*परिस्थितीच्या मार्याने*
*काहीसे झुकलेले बाबा*
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
दिवसभर मरमर काम करुन
थकलेले बाबा प्रवास करतात
आपल्याच बॅगेवर पाय पसरून
खिडकीजवळ आराम करतात.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*थकलेले बाबा*
राबराब राबतात विश्रांती नाही
थकलेले बाबा पाहवत नाही
दमून भागून येतात घरी
वाकला कणा गाऱ्हाणे नाही
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
दिवसभर कष्ट करून
थकलेले बाबा पहावत नाही
स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून
मुलांच्या स्वप्नांसाठी झटत राही
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
कामाहून परतले , झाकुनी मूठ वेदनांची,
शरीर स्थिरावले , वाकुनी मान तयाची…
थकलेला जीव , कष्ट करी सदा,
बघवत नाही ,निराशून थकलेले बाबा…
*कु.साक्षी दत्तात्रय देसाई, दौंड, पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
*केली मेहनत हयातभर*
*नाही मिळाली ना कधी उसंत*
*थकलेले बाबा आपले*
*बसू द्या त्यांना निवांत*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
दिवसभराचा ताण, तणाव झेलून
सांजेला थकलेले बाबा परतात घरी
घरातील आनंदाचे वातावरण बघून
सारा शिण गळून पडतो त्या क्षणी.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
खडतर संसाराच्या वेलीवर
फुले आहेत मुलांच्या रुपात
सदा आईची पाखरण कुटुंबावर
थकलेले बाबा मात्र मुळांच्या रुपात
*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
असतील थकलेले बाबा
कामावरून घरी परततांना
खेळणी, खाऊ पिल्लासाठी
थकत नाहीत आणतांना
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
*थकलेले बाबा*
थकलेले बाबा’ खांद्यावर, ओझं कामाचं भारी,
हातात चिमुकली बाहुली, आठवण लेकीची प्यारी;
घामाच्या प्रत्येक थेंबात, घराची स्वप्नं फुलतात,
स्वतः थकूनही बाबा, लेकरांसाठी जगतात.
*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃🔹🍃➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



