0
4
8
2
9
7
निसर्ग
दव बिंदूच्या नव स्पर्शाने
पाना फुलांना नवरूप यावे
सौंदर्य तयाचे बहरलेले
डोळ्यात साठवून घ्यावे
नदी नाले डोंगर झाडे फुले
नभी पक्षांचे सांजचे थवे
धावणाऱ्या ढगांचे कल्पचित्रे
क्षितिजाचे रंग न्याहाळून घ्यावे
हिरवा शालू नेसून वसुंधरेला
नववधूचे हिरवे हिरवे रुप यावे
इंद्रधनुच्या सप्तरंगात
धरती अंबराचे मिलन व्हावे
मेघ गर्जनेसह पावसाने
बेभान वाऱ्यासह कोसळत राहावे
यौवनातील लाजऱ्या लांडोरीने
मयुराचे आनंदाश्रू टिपून घ्यावे
मावळतीला जाता सूर्याने
रंग केशर सागरात मीसळून जावे
उधाणलेल्या अथांग रत्नकराने
सूर्यालाच अलगद कवेत घ्यावे
प्रकाश पुंडलिक गोधने
कंधार, जि नांदेड
===========
0
4
8
2
9
7



