ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
कोणावाचून अडत नाही
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0
5
1
7
9
4
कोणावाचून अडत नाही
नात्यात उभी दरी आता
कोणी उपयोगी पडत नाही
ज्याचे त्याचे प्रारब्ध
कोणा वाचून अडत नाही
नात्यांचा ओलावा संपला
झालेत मार्ग वेगवेगळे
आपल्यांच्या दुःखालाही
कोणी आता रडत नाही
विश्वास पंखांवर प्रत्येकाचा
आभाळाला जरी गवसणी
हृदया पाखरू तरी का
कातर वेळी उडत नाही
नात्यांच्या या बंधनातून
सुटका केली ज्याने त्याने
स्वप्नांचेही इमले आताशा
मनाप्रमाणे घडत नाही
नात्यांचाही वीट यावा
इतका दुरावला माणूस
शेवटी आधार त्यांचाच
का कुणाला कळत नाही?
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
5
1
7
9
4



