Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

जि.प.शाळा सिंगोरी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

हर घर तिरंगा अभियानंतर्गत विविध शालेय स्पर्धाचे आयोजन

0 4 8 2 8 7

जि.प.शाळा सिंगोरी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

हर घर तिरंगा अभियानंतर्गत विविध शालेय स्पर्धाचे आयोजन

रजत डेकाटे, तालुका प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर/ मौदा: येथील सिंगोरी (नर.) केंद्र-तारसा पंस-मौदा, जि.नागपूर येथे 78 वा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हर्षोउल्ल्हाषात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम दि.13 आँगष्ट ते 15 आँगष्ट या कालावधीत ” हरघर तिरंगा, घरघर-तिरंगा”या उपक्रमाद्वारे ” हर घर -राष्ट्ध्वज,घर घर-राष्टध्वज” , “तिरंगा प्रभातफेरी, तिरंगा मानवंदना, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा दौड, तिरंगा कँनव्हास, तिरंगा-रांगोळी, निबंध, भाषण इत्यादी कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

दि.15आँगष्ट 2024ला स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सर्वप्रथम सकाळी प्रभातफेरी काढून “राष्ट्ध्वजाचा..विजय असो””स्वातंत्र्य विरांचा…विजय असो,” जय जवान, जय किसान, जय विज्ञान.”” पंडित जवाहरलाल नेहरुंचा विजय असो, सरदार वल्लभभाई पटेलचा विजय असो”” “महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” राष्टपिता महात्मा गांधीजींचा विजय असो,” क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुलेंचा, विजय असो, “क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो.”घोषवाक्य, देशभक्तीपर गितांच्या जयघोषात शालेय परिसरात मान.सौ.शांतकला खुशाल टेकाम(अध्यक्षा,शा.व्य.स.) व प्रमुख अतिथी मान.वसंतरावजी पोटकिले (माजीसरपंच, आदर्श शेतकरी)यांच्या हस्ते महात्मा गांधीजी तसेच महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन ध्वजारोहण केले.

श्री.राजु नवनागे(मु.अ)यांनी प्रास्ताविक करुन आपण स्वातंत्र्यांची फळे खात आहोत. यात अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिलेत,देशासाठी इमानेइतबारे त्याग दिला.त्यांना विनम्रता पुर्वक अभिवादन केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांची गुणवत्ता कशी वाढेल,त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आव्हान केले.तर श्रीमान वसंतराव पोटकिले(माजी सरपंच/आदर्श शेतकरी)यांनी स्वातंत्र्याची महिमा यावर प्रकाश टाकुन तंत्रज्ञान शेतीविषयक माहीती देऊन बळीराजा संपन्न होवो ही सदिच्छा बाळगून विद्यार्थ्यांचे कौतुक करुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर श्री.निळकंठ कुंभलकर(शा.व्य.स.सदस्य) यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या व पालक ,शिक्षक यांचे कर्तव्य काय ते स्पष्ट करुन पालकांनी पाल्यांकडे अभ्यासाविषयी विशेष लक्ष द्यावे. अशी विनंती केली.

माननीय नवनियुक्त अध्यक्षा सौ. शांतकला खुशाल टेकाम (अध्यक्षा. शा.व्य.स.) यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करुन मुलांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे पालकांचे लक्ष वेधून पालकांनी घरी दररोज नियमित पणे अभ्यास घ्यावाअशी विनंती केली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या जमा झालेल्या पैशातुन “राजमाता जिजाऊ” व “त्यागमुर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर” यांची प्रतिमा मान्यवरांच्या हस्ते जि.प.प्रा.शा.सिंगोरी (नर.)मु.अ.राजु नवनागे सरांना भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांचे उपस्थिती असलेल्या सर्व गावक-यांनी टाळ्या वाजवून “राजमाता जिजाऊ अमर रहे।। तसेच “त्यागमूर्ती रमाईंचा विजय असो..।। अशी घोषणाबाजी केली.यात सर्व शा.व्य.समितीचे पदाधिकारी, सर्व स्त्री/पुरुष बचतगट आणि गावकरी उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला हातभार लावून कार्यक्रम यशस्वी केला.सर्वांचे आभार मानून खाऊ वाटप करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे