Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

‘अनुभूतीकडे अंतर्मनातील तरलतेने पाहिल्यास कवितेत अधिक प्रगल्भता येईल’; डाॅ.मधुसूदन घाणेकर

राज्यातील पाच कवयित्री 'वर्ल्ड पोएट्री' पुरस्काराने सन्मानित

0 4 8 2 8 4

‘अनुभूतीकडे अंतर्मनातील तरलतेने पाहिल्यास कवितेत अधिक प्रगल्भता येईल’; डाॅ.मधुसूदन घाणेकर

राज्यातील पाच कवयित्री ‘वर्ल्ड पोएट्री’ पुरस्काराने सन्मानित

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: “कवितेमधे अधिकाधिक
प्रगल्भता येण्यासाठी प्रतिभावंतांमधे उपजत तरलता, सृजनशिलता, भोवतालच्या विश्वाकडे सकारात्मकतेने पहाण्याची सजगता हवी.तसेच व्यापक पातळीवरील व्यासंगामधे सातत्यही आवश्यक आहे ” असे प्रतिपादन वर्ल्ड पोएट्री संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

काव्यक्षेत्रासाठी रचनात्मक कार्यातून योगदान देणा-या आणि काव्यलेखनातील वैशिष्ट्य.पूर्ण आणि आशयघन निर्मिती करणा-या पाच कवयित्रींना डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच 2024 च्या वर्ल्ड पोएट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते.

महिला सबलीकरणासाठी झटणा-या कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे, दीपाराणी गोसावी, अनेक उदयोन्मुख कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ देणा-या तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले , सुनीता कावसनकर , ‘मधमाशी वाचवा विश्व वाचवा अभियान आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवणा-या आणि सामाजिक समरसतेच्या भूमिकेतून काव्यलेखन करणा-या कवयित्री मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे अशा पाच कवयित्रींना डाॅ.घाणेकर यांनी वर्ल्ड पोएट्री पुरस्काराने सन्मानीत केले.”

अत्यंत प्रतिकुलतेशी झगडत असताना ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी मला उच्च पातळीवरील पुरस्काराने सन्मानित केल्यानेनिश्चितच हा पुरस्कार मला प्रेरणादायी आहे ” या शब्दात कवयित्री सुनीता कावसनकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी शहर कार्याध्यक्ष भारती महाडिक यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग तसेच वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांनी सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे