को ए सो माध्यमिक शाळा खंडाळे च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सपंन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
को ए सो माध्यमिक शाळा खंडाळे च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सपंन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि २) तालुक्यातील नेहुली – खंडाळे येथील को ए सो माध्यमिक शाळेंच्या सन 1992 साली इयत्ता १० वि या वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यर्थी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच बेलकडे येथिल पोसायडन्स रिसॉर्ट ला पार पडला . हे माजी विद्यर्थी आणि त्यांना त्यावेळी शिकविणारे शिक्षक जवळजवळ 34 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आले होते.
यावेळी शाळेतील तत्कालीन शिक्षक एस. के. म्हात्रे, कुंदा ठाकूर, रवींद्र ठाकूर आणि श्री. कुंभार सर आणि माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत 1992 पासून 1926 पर्यंतचा प्रवास आपापल्या मनोगतात व्यक्त केला. यामुळे शाळेतील जुने दिवस जुन्या आठवणी असे एक एक क्षण त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले होते.
प्रत्येकानी आपल्या मनोगतात शिक्षकांबद्दल कृतघ्नता व्यक्त केली. दुपारी पेण येथिल प्रसिद्ध गायक संतोष पाटील यांच्या गायनाच्या कार्यक्रमात माजी विदयार्थ्यांनी पण गाणी गाऊन धमाल केली. सदर स्नेहसंमेलनाला सतीश समुद्रे, प्रसाद पाटील, समीर मालोदे, संजय वेंगुर्लेकर, बंटी चव्हाण, महेश घरत, सुनील समुद्रे, राजश्री दाबके, कांचन पाटील, शैलेश पेडणेकर, प्रसाद नाईक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी उमेश पाटील याने अतिशय सुश्राव्य सूत्रसंचालन केले.



