Breaking
ई-पेपरकवितामुंबईसाहित्यगंध

फूल

प्रांजली गुरुप्रसाद भट्टगांवकर मीरा रोड मुंबई, जि. ठाणे

0 4 8 2 9 0

फूल

कधी वेणीमध्ये दिसते
कधी हारामध्ये शोभते
कधी नुसतेच गळून पडते
कधी शय्येवरती सजते

कधी देवापायी रहाते
कधी शुभेच्छापत्रात असते
कधी निर्माल्यात गवसते
कधी तिरडीवर पहुडते

कोणी प्रेयसीला देतो
कोणी फुलदाणीत सजवतो
कोणी सुगंध त्याचा घेतो
कोणी उगा चुरगळा करतो

पांढरा तांबडा पिवळा
रंग विविधांगी त्याचे
सुगंधही वेगळाले
परि नाव फुल त्याचे

जाती निरनिराळ्या फुलांच्या
सुगंध पसरवती दशदिशा
कळीलाही असते मनी
उद्या फुल व्हायची आशा

प्रांजली गुरुप्रसाद भट्टगांवकर
मीरा रोड मुंबई, जि. ठाणे

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे