Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

“बाली इंडोनेशिया ट्रिप”; भाग – ५

वसुधा वैभव नाईक

0 4 8 2 8 4

“बाली इंडोनेशिया ट्रिप”; भाग – ५

दि. ४/०४/२०२५ रोजी सकाळीच सर्व सामान पॅक केले. आज रिसाटा रिसॉर्ट सोडायचे होते. सामान पॅक करूनमप्रत्येकाने आपापल्या रूमच्या बाहेर ठेवून दिले. रिसॉर्टवर नाश्ता केला. गाईड आणि गाडी दोन्ही आलेले होते. आज दोन गाड्या आल्या होत्या. एक सामान ठेवण्यासाठी आणि एक आम्हाला घेऊन जाण्यासाठी. एका सामानाच्या गाडीमध्ये सामान ठेवले गेले व ती गाडी उबुड या ठिकाणी आमच्या पुढच्या निवासस्थानी गेली. आम्ही गाडीमध्ये बसलो. ‘तनाला लॉट’ या टेम्पल ला भेट देण्यासाठी पुढे निघालो.

आमच्या गाईडने आम्हाला माहिती सांगण्यास सुरुवात केली. येथील घरांची ठेवण कशी आहे हे आज ते आम्हाला सांगत होते. प्रत्येक घराला कंपाउंड वॉल आहे आणि ती डेकोरेटिव्ह आहे. कंपाउंड वॉलचे काळ्या दगडात कोरीव काम केलेले आहे. प्रत्येक घरावर कौल आहेत. घर एक किंवा दुमजली आहे आणि प्रत्येक घराच्या समोर देवता आहेत. वरूण देवता आणि गणपती बाप्पा आहेच. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी आहे. आम्ही तनाला लॉट टेम्पल या ठिकाणी पोहोचलो. निळाशार समुद्राची किनारा लाभलेले हे टेम्पल अप्रतिम होते.

येथील प्रत्येक टेम्पलची खासियत पूर्ण वेगळी आहे. अप्रतिम कोरीव काम काळ्या दगडामध्ये आहे. नंतर त्याला रंगवलेले आहे. रंगकाम सुद्धा आगळे वेगळे आहे. भरपूर फोटोसेशन व्हिडिओ काढून आम्ही पुढे निघालो. “बाली स्विंग’ व्हिलेज येथे गेलो. येथे उंच उंच झोपाळे, निसर्गाच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव पाहायला मिळाले. या उंच झोपाळ्यांचा आम्ही अनुभव घेतला. खाली खोल दरी होती, पण भीती वाटली नाही. धडधड सुद्धा झाली नाही. याचे महत्त्वाचे कारण एक त्या स्वींगचे आकर्षण होते. आम्ही अशा चार स्विंगमध्ये बसलो. त्यांचीच ड्रेपरी केली, मस्त झोपाळ्यावर झुललो. खूप सारे व्हिडिओ शूटिंग फोटो काढले. हौसेला मोल नाही. हा प्रत्यक्ष अनुभव तिथे गेल्यावर घेतला.

दुपारी ‘पडांग’ हे इंडोनेशियन फूड त्याचा आस्वाद घेतला. पुढे आम्ही वोल्कॅनो डोंगर पहावयास गेलो. डोंगर अक्षरशः आग ओकतोय असे दिसत होते. त्या ठिकाणी भारतीय करन्सी मध्ये आम्हाला खरेदी करता आली. थोडे बाजारात फिरलो. काही गोष्टी खरेदी केल्या. येथील कल्चर खूप आवडले. स्ट्रॉंग कल्चर आहे. येथील लोक खूप अगदी आणि नम्रतेने बोलतात. आवाज नाही, भांडणे नाहीत शांततेत सर्व चालू असलेले दिसले. येथील लोक आर्टिस्ट आहेत. प्रत्येकामध्ये एक वेगळे स्किल पाहायला मिळाले. रात्री डिनर आम्ही इंडियन टॉक्स या हॉटेलमध्ये केले. ‘उबूड’ या ठिकाणी व्हिलामध्ये आम्ही आलो. हा विला म्हणजे कित्येक एकरात बांधलेले हे हॉटेल आहे. येथील रूम्सला लागूनच स्विमिंग टॅंक होते. खोल्या प्रशस्त होत्या. हॉटेल मधून रूमवर जाण्यासाठी गाड्या होत्या. निसर्ग सानिध्यात बांधलेले हे हॉटेल अप्रतिम आहे.

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे