
0
4
8
2
8
4
बोभाटा
मनातल्या गोष्टी कधी कधी
मनातच ठेवाव्या लागतात
नाही तर केला बोभाटा मग
लोकांच्या दृष्ट नजरा लागतात
जे काही कर्म करावे
लोकांच्या नजरेत येऊ नये
लोकांनाही बोभाटा करण्याची
कधीच संधी देऊ नये
काम करण्याआधी
जर त्याचा बोभाटा झाला
तर समजा त्या कार्यात
नक्कीच अडथळा आला
बोभाटा करणाऱ्याचं
जगात हसू होत असते
आणि त्याच्या कार्याला
कधीच यश येत नसते
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड नागपूर
0
4
8
2
8
4



