0
4
8
2
9
7
नवांकुर
मिळतात कितीतरी जखमा
पण वेदनेला मी हरवते
ढासळून पडण्याआधी
पुन्हा खंबीर होऊन जगते..
कधी कधी येतं अपयशही
यशोशिखर दूर भासते
हुलकावणी देऊन त्याला
जिद्दीने मी पेटून उठते..
कधी येतात संकटं
घेरून टाकतात भवताल
तरीही तेवत ठेवते मनात
संघर्षाची मशाल..
तो कणखरपणा
ती चिकाटी
ते पेटून उठणं
नि स्वतःला सिद्ध करणं
याचं बीज मनात पेरलंय
म्हणूनच
फुटतो नवांकुर आशेचा
नि जगणं समृद्ध झालंय..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
========
0
4
8
2
9
7



