0
4
8
2
8
4
स्वार्थ उगाच नडले
ठाव असून देखील,
किती कितीदा ताणावे…
जास्त ओढता तुटतो,
तरी तथ्य न जाणावे…१
जपा मर्यादा वेळीच,
बांधा सलोख्याचे बंध…
आपुलकी संबंधात,
वाहे प्रितीचाच गंध…२
नको अहंकार घृणा,
नको जाळावया कुणा…
नाही तेथे सुख शांती,
जिथे असे द्वेष खुणा …३
भाऊ बंदकी संपली,
ऱ्हास प्रितीचा झालाय…
रक्त नात्यात संकटी,
नाही धावूनी आलाय…४
ऐश्वर्याच्या शर्यतीत,
नाते मागेच पडले…
“सुधाकरा” येथे त्यांना,
स्वार्थ उगाच नडले…५
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, नागपूर
0
4
8
2
8
4



